शिक्षकांवर शासनाकडून जाणीवपूर्वक अन्याय….

शिक्षकांची चेष्टा तातडीने थांबवावी!!

अहमदनगर : मेट्रो न्यूज 

बिनपगारी काम करणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना शासनाने जाणीवपूर्वक अनुदानापासून वंचित ठेवले आहे.या शिक्षकांवरील अन्यायाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी दिला आहे .तसेच शासनाने  पत्र तातडीने मागे घ्यावे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.
अन्यायकारक जाचक अटी व शर्ती लादून शासन विनाअनुदानित,अंशतः अनुदानित शाळांमधील  ६३ हजार शिक्षकावर जाणीवपूर्वक अन्याय करत आहे.अंशतः अनुदान, घोषित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांना शंभर टक्के अनुदानित पगार सुरू करण्याची गरज आहे. विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षकांची चेष्टा तातडीने थांबवावी, अन्यथा राज्यभर सर्व  शिक्षक आंदोलन करतील, असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.तपासणीच्या नावाखाली चालढकल बंद करावी , विनाअनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करून अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली आहे; पण वारंवार तपासणीच्या नावाखाली शासन चालढकल करीत आहे. हा प्रकार तातडीने थांबवावा अन्यथा आंदोलन करण्याशिवाय  शिक्षकांकडे कोणताही पर्याय राहिला नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.