अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलने यश संपादन केले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी उज्वल निकालाची परंपरा कायम राखत शिष्यवृत्ती परीक्षेत सात विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीत परीक्षेत (इयत्ता पाचवी) जान्वी किरण फुलसौंदर, सिध्दी अभय गुगळे, दिशाली महावीर   मुथ्था तसेच तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी) प्रसाद मोरे, प्रज्ञेश लुणिया, अमय बोरगे, केवल देशपांडे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहे. प्रसाद मोरे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत बावीसावा आला आहे. शिष्यवृती परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या अध्यापकांचे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी अभिनंदन केले आहे.