औरंगाबाद जिल्ह्याची “छत्रपती संभाजीनगर” नावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी महामंडळाच्या व्यवस्थापकांना निवेदन

राज्य आणि  केंद्र शासनाच्या निर्णयानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे झाले आहे. असे असताना देखील  राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कार्यरत असलेल्या बर्‍याचशा  बस, बस स्थानक आणि  बस डेपो तथा महामंडळाच्या नाव फलकावर छत्रपती संभाजीनगर या नवीन नावाऐवजी जुन्याच नावाचा उल्लेख आजूनही  दिसत आहे.

हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नाव  त्वरीत टाकण्यात यावे यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व मुख्यमंत्री वैद्यकिय कक्ष सहायता निधीचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत  शेळके यांनी राज्य परिवहन महामंडळ अहमदनगरचे व्यवस्थापक यांच्याकडे निवेदन केले  आहे. तातडीने नामांतराबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील बस, बस स्थानक व बस डेपो मध्ये नामांतराची अंमलबजावणी करुन औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करण्याची मागणी शेळके यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाकडे केली आहे.