H3N2 इन्फ्लुएन्झामुळे अहमदनगरमध्ये एका तरुणाचा मृत्यू

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली माहिती

H3N2 इन्फ्लुएन्झा मुळे राज्यातील पहिला मृत्यू नगरमध्ये झाला.  वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला हा विद्यार्थी रुग्णालयात दाखल होण्यासाठी नकार देत होता.  त्यातूनच गुंतागुंत वाढत जाऊन त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि त्याचा मृत्यू झाला आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय घोगरे यांनी ही माहिती दिली आहे.

त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय घोगरे यांनी तातडीने डॉक्टरांची बैठक घेऊन उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना केल्या.त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या.त्याच्या संपर्कात असलेल्या कोणालाही संसर्ग आढळून आला नाही. सुमारे ६६ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

लक्षणे दिसून आल्यास लगेच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे, .महापालिकाही यासंबंधी सतर्क झाली आहे. शहरातील सर्व रुग्णालयांची बैठक घेण्यात आली. त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. संशयित रुग्णांची तापसणी करण्यात यावी, रुग्ण आढळून आल्यास तातडीने महापालिकेला कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली.