कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले अवयवांचे रेट कार्ड
राज्यात एकीकडे दुष्काळ तोंडावर असताना नापिकी शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसमोर जगण्याचाच प्रश्न उभा राहिला आहे.अशातच शेतकऱ्यांची विदारक स्थिती मांडणारे वास्तव हिंगोलीत सामोरे आले आहे. यंदा शेट्टी पिकली नाही मला नाही. भाव नाही पिक विमा मिळाला नाही आता कर्ज फेडायचे तर आमची किडनी डोळे लिव्हर अवयव विकत घ्या. आणि कर्जाची परतफेड करा. अशी मागणी हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी केली असून त्याच निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल आहे.त्यामुळे आता बँक कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.त्यामुळे हिंगोलीतील शेतकऱ्यांनी आपल्या अवयवांचे रेट कार्ड मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे पाठवले आहे.