कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र्र कुश्ती चषक

तब्बल सव्वा तास लढत देऊन केले चितपट

पाथर्डी तालुक्यात रंगलेल्या उत्तर महाराष्ट्र्र कुश्ती चषक स्पर्धेत नगरचा सुदर्शन कोतकर याने नाशिक येथील मल्ल बाळू बोडखे याचा विरोधात तब्बल सव्वा तास लढत देऊन त्यास चितपट करत उत्तर महाराष्ट्र्र कुश्ती चषक पटकवला .यावेळी विजयी मल्लास ऍड .ढाकणे  यांनी चांदिची गदा  व  ५१ हजार रुपयांचे रोक बक्षीस दिले .

  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर  परिषदेचा मान्यतेने अहमदनगर जिल्हा तालीम संघ संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे व श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांचा सयुंक्त विद्यमाने एम एस निऱ्हाळी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात कुस्त्यांचा थरार रंगला. सकाळ ते संध्याकाळ पर्यंत सहा गटात कुस्त्या रंगल्या होत्या .सर्व कुस्त्या मॅटवर घेण्यात आल्या . शेवटी उत्तर महाराष्ट्र कुश्ती चषक स्पर्धेची कुस्ती लाल मातीत बेमुदत लावण्यात आली .

 

 यामधील विजयी मल्ल सुदर्शन कोतकर यास ऍड .ढाकणे  यांनी चांदिची गदा व ५१ हजार रोक बक्षीस दिले . उपविजयी मल्ल बाळू बोडखे यास ३१ हाजर रुपये व चषक तसेच त्रितिय मल्लास अनिल ब्राम्हणे यास २१ हजार रोख व चषक देण्यात आले.  यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे ,खजिनदार नाना डोंगा रे ,पाथर्डी तालुक्याचे तालीम संघाचे सचिव राजेंद्र शिरसाठ ,शहर अध्यक्ष नामदेव लंगोटे ,मोहन हिरानवाले,ह्रिषीकेश ढाकणे ,ऍड. सिद्धेश्वर ढाकणे ,माजी सभापती काशिनाथ लवांडे  ,पाथर्डी राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे ,रफिक शेख ,सीताराम बोरुडे ,नगरसेवक बंडू बोरुडे ,दीपक देशमुख ,लक्ष्मण डोमकावले ,हाजी हुमायूं अत्तार ,गहिनाथ शिरसाठ सतीश मुनोत  , कपिल अग्रवाल सुनील भिंगारे महादेव आव्हाड ,शिवाजी खेडकर उपस्थित होते.
या स्पर्धेत ४८ किलो गटात संकेत सतरकर (प्रथम नगर)अंकुश भडांगे (द्वितीय नाशिक ),वैभव तुपे (त्रितिय नाशिक ).  ५८ किलो वजन गटात पवन ढोंन्नर (प्रथम नाशिक), शुभम मोरे (द्वितीय नाशिक ), महेश शेळके (तृतीय नगर ) ,६५ किलो वजन गटात सुजय तनपुरे (प्रथम)  भाऊसाहेब सद्गिर (त्द्वितीय) ,अशोक पालवे (त्रितिय) ,७४ किलो  वजन गटात महेश फुलमाळी  प्रथम ,संदीप लटके द्वितीय ,आकाश घोडके त्रितिय (तिन्ही मल्ल नगर) , ८४ किलो वजन गटात ह्रिषीकेश लांडे (प्रथम नगर ) विजय पवार (द्वितीय श्रीगोंदा ) विकास गोरे (त्रितिय नगर )  यांनी बक्षीसे पटकावली . 
           
कुस्ती स्पर्धेचे संवलोकन शंकर अण्णा पुजारी यांनी केले ,स्पर्धेचे पंच म्हणून गणेश जाधव ,संजय दफळ, शुभम जाधव ,राहुल कापसे ,चेतक बलकवडे ,राम  यादव , गणपत चुंबळे ,सनी चौधरी ,हरी शिंदे यांनी काम पहिले .