कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांना दहा हजारांचा दंड .

नगर – माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले याचा विवाह बुऱ्हानगर तारीख २९ ला पार पडला . या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डीले याना दहा हजारांचा दंड झाला आहे . हा दंड भिंगार कॅम्प पोलिसांनी ठोठावला आहे . या विवाहात सोन्याची चैन व दुचाकी चोरण्याची घटना सुद्धा घडलेली आहे ,
अक्षय कर्डीले यांचा विवाह प्रसंगी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली  होती . विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवनिस , चंद्रकांत पाटील , खासदार सुजय विखे , राधाकृष्ण विखे , गिरीश महाजन , राम शिंदे ,बबनराव पाचपुते ,यांच्यासह राजकीय नेते या लग्नात सहभागी झाले होते . या लग्नात हजार असलेलले राधाकृष्ण विखे , बाळासाहेब थोरात कोरोना बाधित असल्याचे त्यांनी जाहीर केले . तर या विवाह सोहळ्यात चोरटयांनी  आपला हात साफ करून  घेतला . विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या वर्हाडी  ची ९८  हजारांची सोन्याची चैन चोरटयांनी लंपास केली  तर या संदर्भात  अण्णा सोपान जगताप ( रा. माथणी ता. नगर ) यांनी या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली  आहे .