एसटीचे ११५३ कर्मचारी हजार

नगर — गेल्या दोन महिन्या पासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरु आहे . या आंदोलनामुळे एसटी ची सेवा पूर्ण पने बंद आहे .परंतु गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या संपामुळे कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत त्यामुळे अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे या संपला एसटी कर्मचारी वैतागले आहेत ,त्यामुळे कामावर येण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी तयारी दाखवली आहे .आज अखेरपर्यंत एस टी चे ११५३ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत .
विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यापासून काम बंद आंदोलन हाती घेतले आहे . या आंदोलनामुळे एसटी ची सर्व सेवा ठप्प झाली होती . सध्या खाजगी व अवैध वाहतूक  जोमाने सुरु आहे , खासगी वाहतूक जोमाने सुरु असल्याने एसटी ला चांगलाच फटका बसला आहे . संपामुळे एसटी अहमदनगर विभागाला २८ कोटींचा फटका बसला आहे . राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांचा काही मागण्या मान्य केल्या परंतु , परंतु राज्य सरकारमध्ये एस टी कर्मचाऱ्याचे विलगीकरण करून घ्यावे , या मागणी साठी कर्मचारी ठाम असल्याने आंदोलन चिघळत चाले आहे . परिणामी एसटी महामंडळाला आंदोलनाचा चांगला फटका बसल्याने प्रशासनाने निलंबनाची कारवाई सुरु केली आहे . मात्र तरीही काही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत .