गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली
अनंत चतुर्थीच्या दिवशी पाईपलाईन रस्त्यावर मृत्युंजय युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यशोदानगर येथे विहिरीत विसर्जन मिरवणुकीने गणेश मंडळ व नागरिक घरगुती गणेशाचे विसर्जन करतात. तसेच गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारून प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद नाकाडे रा. गुलमोहर रोड व अध्यक्ष अकिब शेख रा. गुलमोहर रोड यांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस बजावली आहे. 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेस यशोदानगर येथे विसर्जन कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी तोफखाना ठाण्यात परवानगीची मागणी केली होती. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकरून मृत्युंजय प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. यापूर्वी नगर शहरात तसेच तालुक्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रम झाल्यावर कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे विसर्जनादिनी यशोदा नगर येथे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येणार नाही॰ याउवरही इथे कार्यक्रम केल्यास प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह गौतमी पाटील त्यांच्याविरुद्ध कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.