छावणी परिषदेचे उपाध्यक्ष राठोड यांनी केली भिंगार मधील जॉगिंग पार्कची पहाणी

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी उद्यानाबाबत मांडले प्रश्‍न सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचे राठोड यांचे आश्‍वासन

भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कची छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी पहाणी केली. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी जॉगिंग पार्कमध्ये असलेल्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून, नागरिकांच्या सोयीसाठी समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी केली. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडदे, माधव भांबुरकर, मिलिंद क्षीरसागर, आसाराम बनसोडे, दिलीप ठोकळ, अमित संकलेचा, हितेंद्र चौधरी, भागवत चिंतामणी, दत्तात्रय कुंदेन, उमेश छजलानी, सचिन चोपडा, नागेश खुरपे, संजय सुपेकर, विशाल भामरे आदी उपस्थित होते.


हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य सकाळी योग, प्राणायाम, व्यायाम व जॉगिंगसाठी येत असतात. ग्रुपच्या वतीने उद्यानात अनेक प्रश्‍न मार्गी लाऊ झाडे देखील लावण्यात आली आहेत. त्या झाडांचे संगोपन देखील ग्रुपचे सदस्य करीत आहे. मात्र काही महिन्यांपासून छावणी परिषदेचे उद्यानाकडे दुर्लक्ष झाल्याने उद्यानात अनेक प्रश्‍न भेडसावत आहे. उद्यानात वीज, पाण्याची सोय नसून, ट्रॅकवर लेवल नाही. पाऊस आल्यास ट्रॅकवर पाणी साचत आहे. योगा, प्राणायामसाठी ओटे नसल्याने योगा करताना गैरसोय होत असल्याचे विविध प्रश्‍न सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच इतर समस्या संजय सपकाळ यांनी छावणी परीषदेचे उपाध्यक्ष राठोड यांना प्रत्यक्ष दाखवल्या. उपस्थित ग्रुपचे सदस्य व नागरिकांनी देखील विविध अडचणी मांडल्या. भगवान गौतम बुद्ध जॉगींग पार्क मधील प्रश्‍न सोडविण्यासाठी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष राठोड यांनी कर्मचार्‍यांना सूचना केल्या. तर इतर प्रश्‍नांबाबत अधिकार्‍यांशी चर्चा करुन ते सोडविण्याचे आश्‍वासन दिले.