डिच्चूकावा हा प्रजासत्ताक राजधर्माचा भाग म्हणून राबविण्याची गरज -अ‍ॅड. गवळी

भ्रष्टमतदान भाड जोंधळा शपथप्रथा मोडीत काढण्यासाठी मतदान डिच्चूकावा

भ्रष्टमतदान भाड जोंधळा शपथप्रथा मोडीत काढून मतदान डिच्चूकावा संकल्प प्रथा अंमलात आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदने पुढाकार घेतला आहे. डिच्चू कावा तंत्राने भ्रष्ट मार्गाने निवडून येणार्‍या अकार्यक्षम व भ्रष्ट लोकप्रतिनिधींना घरचा रस्ता दाखवून चांगल्या उमेदवारांना संधी मिळण्यासाठी कार्य केले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

प्रजासत्ताक राजधर्म भारतात खर्‍या अर्थाने राबवला जात नाही. अनेक मतदार भ्रष्ट उमेदवारांना आपली मते हजार पाचशे रुपये घेऊन हातात जोंधला घेऊन शपथ घेतात. त्यामुळे वोट माफियांचे फावते आणि मागच्या दाराने सत्ता मिळविण्यात ते यशस्वी होतात.दहशत आणि भ्रष्टमतदान भाड तंत्राचा वापर भारतात सातत्याने सुरु आहे. त्यामुळे चांगले उमेदवार निवडून येत नाही. यामुळे स्वातंत्र्याची फळे सर्वसामान्यांना मिळालेली नाहीत. कोट्यावधी लोक घरकुल वंचित आहे. तर मोठ्या संख्येने युवक बेरोजगार आहेत. भ्रष्टमतदान भाड आणि दहशतवाद करणारे उमेदवार निवडून आल्यावर समाज, देशाचा विचार न करता स्वत:ची घरे भरतात. सत्तेचा उपयोग स्वत:साठी केला जातो. प्रजासत्ताक राजधर्म खर्‍या अर्थाने राबविण्यासाठी डिच्चूकावा एक यशस्वी उपाय ठरणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


देशातील मतदारांना भ्रष्टमतदान भाड जोंधला शपथप्रथेमुळे अनागोंदी, भ्रष्टाचार, टक्केवारीत, शासन-प्रशासन व्यवस्थेची गैरव्यवस्था पसरली आहे. या जागृती देखील सर्वसामान्य नागरिकांमध्ये केली जाणार आहे. भ्रष्टमतदान भाड जोंधळा शपथप्रथा मोडीत काढण्यासाठी डिच्चूकावा हा प्रजासत्ताक राजधर्माचा भाग म्हणून राबविण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.