उद्या 31 केंद्रांवर होणार शिक्षक पात्रता परीक्षा.

जिल्ह्यातील ३१ केंद्रावर रविवार (दि .२१ ) रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी ) होणार आहे . या परीक्षेसाठी परीक्षार्थीनी परीक्षा सुरू होण्यापूवी २० मिनीट आधीच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले आहे .
ही परीक्षा मराठी , इंग्रजी , उर्दू , हिंदी , कन्नड , तेलगू या भाषातून होणार आहे . टीईटीच्या परीक्षा दोन टप्यात म्हणजेच पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक दोन अशा पध्दतीने होणार आहे. यात पेपर एकसाठी १ ते ३० आणि पेपर दोनासाठी ३० ते ६१ असे परीक्षा केंद्र राहणार आहेत . पेपर एकसाठी १० हजार ४१० विद्यार्थी राहणार असून पेपर दोनसाठी ९ हजार ७०४ विद्यार्थी राहणार आहेत . परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पाटील यांनी दिली .

दरम्यान रविवारी होणाऱ्या या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून परीक्षेसाठी १५ झोनल अधिकारी , ६१ केंद्र संचालक , ६१ सहायक परीरक्षक , पर्यवेक्षक ( प्रति ब्लॉक मागे एक ) असे १ ९ ० राहणार आहेत . यासह समावेशकांची संख्या ही ८४३ राहणार असून लिपीकांची संख्या १२२ , परीक्षेसाठी २४४ शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे .