नगरमधील व्यापारी महेश  संचेती सह ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल 

बोगस साठेखताद्वारे वाळुंज येथील महार वतनाची १३३ गुंठे इनामी  जमीन हडपण्याचा प्रकार

नगरमधील व्यापारी महेश  संचेती सह ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल 

 

अहमदनगर (प्रतिनिधी) :- नगरमधील व्यापारी महेश सुमतीलाल संचेती यांच्यासह ५ जणांविरुद्ध बोगस कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात भा. द. वि. ४१५, ४१७, ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ कलमान्वये हा फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

And also watch this 

नगर तालुक्यातील वाळुंज येथील गायकवाड कुटुंबाच्या मालकीची महार वतनाची जमीन खोट्या कागदपात्रांच्या आधारे लाटण्याचा प्रयत्न महेश सुमतीलाल संचेती ने केला. त्यासाठी जमिनीचे मूळ वारस १९ जण असताना त्यापैकी फक्त ५ जण दाखविण्यात आले आणि प्रत्यक्षात ३० गुंठे जमीन खरेदी करतांना १३३ गुंठे जमीन खरेदी करण्यात आली. असे कागदोपत्री दाखविण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या पोलीस तपासात जमीन विक्रीत फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आणि हा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार हा एफ आय आर तोफखाना पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आला.

बोगस साठेखताद्वारे वाळुंज येथील महार वतनाची १३३ गुंठे इनामी  जमीन हडपण्याचा प्रकार 

      घडले असे की , नगर तालुक्यातील वाळुंज येथील गंगाराम रामभाऊ गायकवाड यांच्या मालकीची जमीन आहे. तिचा गट नं. २८२ व २८७ आहे. त्यात त्यांच्या आणि इतर हिस्सेदार भाऊ बंद यांची महार वतन असलेली इनामी १०३ गुंठे जमीन आहे. मोलमरूरी करून कुटुंबाचे पोट भरणाऱ्या गायकवाड यांनी आपली जमीन विकण्याचे ठरवले. ही बाब त्यांनी आपल्या चुलत भावांना सांगितली तेव्हा त्यांचा चुलत भाऊ कैलास सावळा गायकवाड याने ही जमीन तू अगोदरच विकली आहे असे सांगितले .  त्यासाठी त्याने एक नोटरी दस्त दाखवला. प्रत्यक्षात गायकवाड यांनी कधीच जमिनीचा व्यवहार करून कुणालाच जमीन विकलेली नव्हती.

         आणखी एक जमीन खरेदी घोटाळा उघड 

कैलास गायकवाड याने दाखवलेला नोटरी दस्त जेव्हा गंगाराम यांनी वकिलामार्फत तपासून घेतला. हा दस्त दि. २७ /०२/ १५ साली काराचीवाला नगर येथील भोसे यांच्या कडे नोटरी केल्याचे लक्षात आले. यात आपली फसवणूक करून कैलास गायकवाड , भाऊसाहेब सूर्यभान गायकवाड , मोहन सावळा गायकवाड , नाथ सावळा गायकवाड यांनी महेश सुमतीलाल संचेती रा. विनायकनगर , अहमदनगर यांना कवडीमोल किमतीत जमीन विकल्याचे उघडकीस आले.                                                                                                                                            या प्रकरणात आपली व आपल्या भाऊ बंधांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार केली. हे प्रकरण पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने तपासले आणि नंतर रीतसर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. संचेती यांनी अगोदर देखील अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तोफखाना पोलिस यांनी रीतसर गुन्हा नोंदवून घेतला आहे. व महेश सुमतीलाल  संचेती यांच्यासह इतर ४ फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे.