विश्व हिंदु परिषदे तर्फे तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांचा सत्कार

२२ वासरे व १ गायीला कत्तलखान्यापासून वाचवून जीवदान

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी धडक कारवाई करून २२ वासरे व १ गायीला कत्तलखान्यापासून वाचवून जीवदान दिले.या गोसेवेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल विश्व हिंदु परिषदे तर्फे तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांचा सत्कार प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख मिलिंद मोभारकर यांच्या हस्ते करण्यात आला.व पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांचा सत्कार जिल्हा सहमंञी गौतम कराळे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी विश्व हिंदू जिल्हामंञी गजेंद्र सोनवणे,कोषाध्यक्ष मुकुल गंधे,नगर शहर गोरक्ष प्रमुख दिपक वांढेकर आदी उपस्तिथ होते.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

 

याप्रसंगी गौतम कराळे म्हणाले कि,गो हत्या बंदी कायदा असून हि कायद्याची अंमलबजावणी होत नाही.बजरंग दल गोरक्षा समितीच्या वतीने गोसंवर्धनाचे गोसेवेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कार्य सुरु आहे.तोफखाना पोलिसांनी कत्तलखान्यात जाणारी गोवन्शची २३ जनावरांची सुटका करून उत्कृष्ट कार्य केले आहे.या करवयींबद्दल सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे बजरंगदलातर्फे अभिनंदन करतो.यापुढेही गोसेवेच्या कार्यास हातभार लावावा.असे सांगितले.