नागरदेवळे येथे मोफत ‘नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया’ शिबीराचे आयोजन
नागरदेवळे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरदेवळे , सरपंच सविता पानमळकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबीरात बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने माया आल्हाट, प्रशांत पाटील, अमित पिल्ले यांनी रुग्णांची तपासणी केली.
यावेळी उद्योजक अण्णा दिघे, यशवंत सावंत, फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, राजेंद्र बोरुडे, गोरक्ष राऊत आदि उपस्थित होते. 283 रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला . तर 67 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुण्यातील बुधराणा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. यावेळी आवश्यक रुग्णांना अल्पदरात चष्म्यांचे वाटपदेखील करण्यात आले. तसेच यावेळी नेत्रदानाविषयी जनजागृती देखील करण्यात आली . यामध्ये सुमारे 45 महिलांनी स्वयंस्फुर्तीने नेत्रदान संकल्प करुन संकल्पपत्रे भरुन दिली.
गेल्या 30 वर्षांपासून आरोग्य सेवेचा हा अखंड यज्ञ सुरु आहे. सर्वसामान्य, गरजूंना मोफत शिबीराच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी फिनिक्स फौडेशनच्या माध्यमातून काम सुरु आहे. गरजूंची नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया द्वारे नवी दृष्टी देण्याचा आमच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे समाधान आहे. राष्ट्र पुरुषांचे विचार हे कृतीतून आचरणात आण्याचा प्रयत्न जयंती-पुण्यतिथीनिमित्त केला जात असल्याचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.