शिवसेनेच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती उत्साहात साजरी

अहमदनगर : मेट्रो न्यूज 

अहमदनगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेनेच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  तसेच स्वस्तिक चौक येथील जनजागृती मित्र मंडळ ट्रस्ट, यश पॅलेस चौक, दिल्ली गेट, चितळी रोडवरील शिवालय, मंगल गेट येथील बजरंग ग्रुप, रायगड तरुण मंडळ, मंगल गेट परिसर, लालटाकी तसेच भिंगार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेवक सचिन जाधव, माजी महापौर शीलाताई शिंदे, तृप्ती आगवडे, प्राची शिंदे, पल्लवी शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक योगीराज गाडे, विक्रम राठोड, ओमकार शिंदे,सुनील लालबोंद्रे,अमोल हुंबे, चंद्रकांत उजागरे,सुरेंद्र गांधी, शिवाजी दहीहंडे, गणेश साठे, शुभांगी साठे,अभिषेक भोसले आदी उपस्थित होते

छत्रपती  शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर समर्थशाली आणि प्रगतशील राज्य उभे केले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांसमोर आणण्यासाठी शिवजयंतीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून काम करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळत असते तरी प्रत्येकाने त्यांचे गुण अंगीकारून आपले राज्य सामर्थ्यशाली व प्रगतशील करण्यासाठी प्रयत्न करावे अशी असे प्रतिपादन शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.