‘पदवीधर’ साठी जिल्ह्यातील १४७ मतदान केंद्रावर ५० टक्के मतदान

'सत्याचा' विजय होणार; भाजप प्रवक्ते आमदार राम शिंदे यांचा दावा

         

          नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कोंग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना छुपा पाठीबा दिला असला तरी  पहिल्या टप्प्यात विरोध करणारी स्थानिक भाजप मात्र तांबेचेच छुप्या पद्धतीने काम करत होती. सोमवारी नगर शहरातील न्यू आर्ट्स  महाविद्यालयाच्या मतदान केंद्राला भाजपचे  खासदार डॉ. सुजय विखे,भाजप प्रवक्ता आमदार  राम शिंदे, माजी मंत्री  शिवाजी कर्डिले यांनी  भेटी देऊन तांबे यांच्या विजयासाठी अप्रत्यक्षपणे समर्थन दिले. या निवडणुकीत ‘सत्या’  चाच विजय झाल्याशिवाय राहणार नाही ,असे वक्तव्य प्रदेश भाजपचे प्रवक्ते शिंदे यांनी करून ‘सत्या’ चा  विजय करण्यासाठी भाजप सरसावल्याचे स्पष्ट  केले. त्यांच्या या वक्तय्या  मुळे कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार तांबे यांना  अप्रत्यक्षपणे भाजपने पाठिंबा दिल्याचे स्पष्ट  झाले.
            दरम्यान , जिल्ह्यातील १४७  मतदान केंद्रावर ५०.४०  टक्के मतदान झाले. मतमोजणी २  फेब्रुवारी रोजी नाशिक येथे होणार आहे   नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १४७  मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजेपासून मतदनाला सुरुवात झाली.नगर शहर व तालुक्यातील १७ मतदान केंद्रावर सकाळ पासूनच  मतदार मतदानासाठी गर्दी करत होते. दुपारनंतर मतदनाची टक्केवारी वाढली, नगर जिल्ह्यात सकाळी १० वाजेपर्यंत ७.२१ टक्के मतदान झाले होते. ८ हजार ३३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला  होता. तर दुपारी  १  वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान झाले आहे. तर २१ हजार ७८२ मतदारांनी मतदान केले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकुम ५०.४० टक्के मतदान झाले.
       ५८ हजार मतदारांनी बाजवला मतदानाचा अधिकार
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या  निवडणुकीसाठी   नगर शहरासह जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८ हजार २०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान पदवीधरसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप यांच्यासह पदवीधरांनी  मतदानाचा हक्क बजावला आहे.