पारशा खुंटावर दोन गटात राडा

नगर — केस  कापण्यासाठी सलून मध्ये नंबर लावण्या वरून शहरातील पिरशहा  खुंट भागात सोमवारी रात्री दोन समाजांचा दोन गटात राडा झाला . दोन्ही बाजूने मोठा जमाव जमला होता . मारामारी करताना वाहनांवर दगडफेक हि करण्यात आली . हा घटनेत चार जण जखमी झाले . या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचा १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता . यातील अटक सात आरोपीना ७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली . दरम्यान घटने नंतर शहराचा काही भागात कडे कोठ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . राजू गफूर शेख ,अरबाज राजू शेख ,ओंकार सतीश  हरबा  , सुदेश हरबा , लंकेश हरबा , कौशल अशोक काटकर , हुजन कुरेशी , शाहरुख शेख , व इतर यांचा यामध्ये समावेश आहे . मिळालेली माहिती अशी कि रविवारी पिरशहा खुंट वर येथील एका सलून मध्ये केस कापण्या वरून दोघात वाद झाला . त्यावेळी तो तात्पुरता मिटला . मात्र सोमवारी रात्री चौकात आलेल्या त्या दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला . काही वेळातच तो वाढत गेला . दोन्ही बाजूनी जमाव जमला .आणि एकमेकांचा अंगावर धावून गेला . बाचाबाची सुरु असताना बाजूला उभ्या असलेल्या वाहनावर दगड फेक झाल्याने मोठे नुकसान झाले . रात्री ९ नंतर जमाव बंदी असताना देखील लोक जमले  . पिरशहा खुंटावर गर्दी जमवून मारामारी सुरु झाल्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस उपाधीक्षक सौरभ अग्रवाल ,शहर विभाग पोलीस अधीक्षक अनिल कातकडे , कोतवाली पोलीस निरीक्षक संपत शिंदे , यांच्यासह अन्य पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील घटना स्थळी पोहोचले . या वेळी जास्तीचा बंदोबस्त मागवण्यात आला होता .पोलिसांनी गर्दी पांगवली , मारामारी करणाऱ्यांची धरपकड केली .त्यामुळे काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली . ,दरम्यान यावेळी झालेल्या दगड फेकीत दोन जण जखमी झाले . त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटना स्थळी चार वाहनांचे नुकसान झाले आहे .  या प्रकरणी दोन आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत .तर सात आरोपीना अटक करून न्यायालयात हजार करण्यात आले होते , न्यायालयाने त्यांना ७  जानेवारी पर्यंत कोठडी मिळाली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे राजेंद्र गर्गे यांनी फिर्याद दिली आहे .