पुजा खेडकरच्या आई वडिलांचा कागदोपत्री घटस्फोट
मुलीला वाचवण्यासाठी आई वडीलांचे शर्तीचे प्रयत्न
पुणे – गेल्या अनेक दिवसांपासुन पुजा खेडकर प्रकरण महाराष्ट्रात धुमाकुळ घालत आहे. अश्यातच पुजा खेडकर हीचे आई वडील दिलीप खेडकर व मनोरमा खेड़कर यांनी घटस्फोट घेतल्या नंतर ही एकत्र राहील्याची माहीती समोर येत आहे. पुजा खेडकर हीने आयएएस होण्यासाठी अनेक घोटाळे केले असल्याची प्रकरणे सध्या समोर येत आहेत. पुजा हीने ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर केले होते. त्यासाठी तीने वडीलांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले होते. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडनुकीत अहमदनगर दक्षिण मतदार संघातुन निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रा मध्ये पुजाचे वडील दिलीप खेडकर यांनी अर्ज भरताना मनोरमा खेडकर या त्यांच्या पत्नी आहेत असा उल्लेख केला होता. त्यामुळे खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट अन् त्या संबंधी प्रश्न उपस्थित होउ लागले आहेत. या पति पत्नीचा घटस्फोट केवळ नॉन क्रिमिलेयरसाठी तर नव्हता ना? असा ही प्रश्न उपस्थित झाला आहे. केंद्र सरकारने नुकतेच मनोरमा आणि दिलीप खेडकर या दाम्पत्याचा घटस्फेट खरचं झाला होता का याचा तपास करण्याचे आदेश राज्य सरकाकर ला दिले होते त्या नुसार राज्य सरकारने पुणे पालिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार २०१० मध्ये खेडकर देमप्त्याच्या समंतीने घटस्फोट झाला होता. दिलीप व मनोरमा खेडकर यांनी २००९ मध्ये पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमंतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना २०१० मध्ये घटस्फोट मंजुर झाला होता. एवढेच नाही तर मनोरमा खेडकर यांनी पोटगी आणि मालमत्तेत हिस्सा देखिल मागितला नव्हता, दोन मुलांचा ताबा देखिल मनोरमा यांच्याकडे होता. मात्र झालेला घटस्फोट फक्त कागदोपत्री होता काय़ असा प्रश्न पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे हे दोघे पति पत्नी म्हणुन पुण्यातील बाणेर भागातील नॅशनल को. ऑप. सोसायटीतील ओमदिप नावाच्या बंगल्यात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. हा बंगला मनोरमा खेडकर यांच्या नावे असुन दिलीप खेडकर हे देखिल पती या नात्याने सोसायटीचे सद्स्य आहेत त्याच बरोबर दीड वर्षापुर्वी दिलीप खेडकर यांनी सोसायटीच्या कॉंमन जिम मधील ट्रेनर व सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. त्याची तक्रार चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासुन पुजा खेडकर या फरार आहेत. पुणे पोलिसांनी त्यांना दोन वेळा समन्स बजावून त्या अद्याप बेपत्ता आहेत.