पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
विविध योगासनाद्वारे विद्यार्थ्यांनी गिरवले योगाचे धडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योगाभ्यास हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. याचेच महत्त्व लक्षात घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले.
शाळेतील शिक्षक गणेश ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, कपालभाती, वज्रासन, गोमुखासन, बद्धकोनासन, सर्वांगासन असे विविध योगासने विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप म्हणाले की, शरीर व मन सुदृढ राहण्यासाठी योग, ध्यान अत्यंत प्रभावी आहे. योगाने निरोगी जीवन व ध्यानने मन शांत होऊन एकाग्र बनते. ज्यामुळे सकारात्मक विचारांचा प्रवाह निर्माण होतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. अभ्यासात चित्त एकाग्र होते. फक्त एक दिवस पुरते योगासने न करता, योग जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे त्यांनी आवाहन केले. तर योगासनाचे महत्त्व सांगितले.
या योग कार्यक्रमात अगदी पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांसह सर्व शालेय विद्यार्थ्यांनी उत्तमपणे योगाची आसने केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षक चंद्रकांत वंजारी यांनी केले. आभार सूर्यकांत बंगारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.