महानगरपालिकेत नामकरणाचा ठराव घेण्याची मागणी

अहमदनगर शहरातील ‘पंम्पींग स्टेशन रोड ते धर्माधिकारी मळा’  येथील चौकास ‘फुले, शाहू, आंबेडकर चौक’  नाव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, शहर प्रभारी संजय डहाणे, शहर उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते सुरज कांबळे, मनोज भिंगारदिवे, प्रकाश भुतकर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

या चौकाच्या नामकरणासाठी महानगरपालिकेच्या सभेत ठराव घेऊन अधिकृतपणे फुले, शाहू, आंबेडकर चौक नाव देण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने बहुजन समाज पार्टीने केली आहे. मागणीच्या निवेदनावर स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.