जायकवाडी साठी नगर नाशिक मधील धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा धरण समूहातून आठ ते दहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मुळा धरणातून रविवारी दुपारी तीनच्या सुमारास चार हजार क्युसेकने जायकवाडीच्या दिशेने पाणी झेपावले. दरम्यान, जायकवाडीचे पथक मुळा धरणावर देखरेखिसाठी तळ ठोकून आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून 8.60 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने 30 ऑक्टोबरला दिले होते. हे पाणी सोडण्यास नगर व नाशिक जिल्ह्यातून विरोध झाला होता. तथापि २४ नोव्हेंबरला रात्रीपासून भंडारदरा धरण समूहातील निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले. मुळा धरणातून रविवारी दुपारी 11 मोरयामधून पाणी सोडण्यात आले. मुळातच जायकवाडी हे अंतर सुमारे 52 किलोमीटर असून त्यापैकी 10 किलोमीटरचे अंतर पाण्याने पूर्ण केले आहे. हे पाणी जायकवाडी पर्यंत पोहोचण्यासाठी 18 तासांचा कालावधी लागणार आहे. निळवंडे धरण ते जायकवाडी 180 किलोमीटर अंतर असून पाणी 20 किलोमीटरवर पोहोचले. पुढील दोन ते तीन दिवसात भंडारदरा निळवंडेचे पाणी जायकवाडी दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.
Prev Post