राज्यात पुढील तीन दिवस पाऊस…. हवामान विभागाची माहिती
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांवर रोग पडण्याची शक्यता....
अहमदनगर : मेट्रो न्यूज
पुढील तीन दिवस राज्यात ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सोमवार ते बुधवार दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
मंगळवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपिट होईल , याशिवाय नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . जालना ,औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे . तर विदर्भात अकोला बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात देखील विजांच्या कडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . ढगाळ वातावरणामुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान होईल. मका ,पपई , केळी आणि उशिरा लावलेल्या गहू ,हरभरा या पिकांवर काही प्रमाणावर नुकसान होईल, या पावसामुळे काढणीला आलेला कांदा गहू आणि हरभरा पिकाला जोरात फटका बसण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे पिकांवर रोग पडण्याची देखील शक्यता आहे. तालुक्यात आणि परिसरात मध्यरात्री विजेच्या कडगडाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात बदल झाला असून ढगाळ वातावरण झाले आहे.