श्रीगोंद्यात महिला पदाधिकारी ने केली आत्महत्या
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील एका महिला पदाधिकाऱ्यांने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . श्यामला मनोज ताडे (वय ४० वर्षे ) असे या पदाधिकारी महिलेचे नाव आहे. त्यांचा मृतदेह आपल्या राहत्या घरामध्ये गळ्याभोवती साडी गुंडाळलेला व फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. दिनांक २० डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. किरण दगडू ताडे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला या घटनेबाबत माहिती दिली आहे.
श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या.त्यांनी अडीच वर्ष नगराध्यक्ष पद भूषविले होते . श्रीगोंदा येथील धनश्री अपार्टमेंट मध्ये त्यांच्या राहत्या घरात ही घटना घडली आहे. पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांनी या घटनेची अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहे.