संत गरीब दासजी महाराज यांच्या बोध दिनानिमित्त शहरातून शोभायात्रा

विश्वप्रसिद्ध जगत्‌गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजजी यांच्या आशिर्वादाने व मार्गदर्शनाने तयाच्या अहमदनगर जिल्ह्यातील अनुयायांनी जगतगुरु तत्वदर्शी संत गरीबदासजी महाराजजी यांच्या कृपा- बोध दिवसाचे निमित्ताने दि. २. ३ व ४ मार्च रोजी विशाल भंडारा व पाठ प्रकाश व सत्संगाचे आयोजन केले आहे.

त्या कार्यक्रमाची माहिती प्राप्त व्हावी  या उद्देशाने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती . छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा, माणिक चौक, कापड बाजार, चितळे रोड, दिल्ली गेट मार्गे महा- रॅलीचे व शोभायात्रेची मिरवणुक काढण्यात आली होती.

या सर्व कार्यक्रमास शहर व जिल्ह्यातील भावीक/भक्तांनी अध्यातमीक जनतेने उपस्तीत राहुन धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भक्त उत्तमदासजी कदम यांनी केले आहे.