मराठी भाषेचा अधिक प्रसार व प्रचार करावा : सुहास मापारी (अप्पर जिल्हाधिकारी)

आपला इतिहास , आपली संस्कृती आणि आपली भाषा ,  यांचा गौरव करणे आणि त्यांचे अस्मिता व अभिमान बाळगणे ,  हे आपले आद्य कर्तव्य आहे.  मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याबरोबरच तिचा अधिकाधिक उपयोग व वापर होऊन मराठी भाषेचा अधिक प्रचार प्रसार करण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात सोमवारी (२७ फेब्रुवारी) रोजी राजभाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . अपर जिल्हाधिकारी मापारी बोलत होते व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील,  उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ , उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड , जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर , जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य डॉक्टर संजय कळमकर , किशोरी मरकड , प्राध्यापक शशिकांत शिंदे,  ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे अधीक्षक संतोष यादव , राधाबाई काळे, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर थोपटे आदी उपस्थित होते.

मापारी म्हणाले भाषा हे जरी ज्ञान मिळवण्याचे माध्यम असले तरी त्यापुढेही जाऊन आपल्या भाषेचा विकास आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.  मराठी भाषा अधिक सोयीस्कर असून ती प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.  मराठी भाषेचा अधिक प्रमाणात प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

आजच्या तरुण पिढीचा समाज माध्यमांकडे अधिक ओढा दिसतो त्यामुळे वाचनाची सवय लोप पावली जात असून तरुणांनी वाचण्याची सवय अंगीकारावी .  सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेणारी नदीसारखी अशी आपली मराठी भाषा आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी डॉक्टर कळमकर यांनी केली