संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा
अभिवादन मेळाव्यातून रविदास महाराजांच्या विचारांचा जागर
चर्मकार संघर्ष समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाजातील विविध संघटनांच्या वतीने शहरात शोभा यात्रा काढून संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. तर अभिवादन मेळाव्यात संत रविदास महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून शोभयात्रा काढण्यात आली. बॅण्ड पथकासह निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला सहभागी झाल्या होत्या. रथात संत रविदास महाराजांचे तैलचित्र मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.