संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा

अभिवादन मेळाव्यातून रविदास महाराजांच्या विचारांचा जागर

चर्मकार संघर्ष समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाजातील विविध संघटनांच्या वतीने शहरात शोभा यात्रा काढून संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. तर अभिवादन मेळाव्यात संत रविदास महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते.

 चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष  शिवाजीराव साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सुनिल त्र्यंबके, भारुडकार हमीद सय्यद, नीलेश बांगरे, विशाल बेलपवार, बाबासाहेब तेलोरे, शोभाताई कानडे, बाळासाहेब केदारे, कैलास गांगर्डे, लताताई नेटके, अभिनव सूर्यवंशी, महेश आहेर, दिनेश परदेशी, सचिन वाघमारे, अरूणाताई गोयल, सिंधुताई कटके, आप्पासाहेब केदारे, ज्ञानेश्‍वर म्हैसमाळे, प्रितीश सुर्यवंशी, सुभाष झरेकर, नंदकुमार गायकवाड, विश्‍वनाथ निर्वाण, बाबासाहेब लोहकरे, रोहिदास उदमले, बापूसाहेब देवरे, कारभारी चिंधे, बाळकृष्ण जगताप, मीनाताई गायकवाड, प्रतिभाताई धस, शशिकला झरेकर, विद्याताई वाघ, वंदना गायकवाड आदींसह समाजबांधव, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून शोभयात्रा काढण्यात आली.  बॅण्ड पथकासह निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला सहभागी झाल्या होत्या. रथात संत रविदास महाराजांचे तैलचित्र मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.