BREAKING | “पाणी आमचा हक्क आहे!” – केडगावातील महिलांचा महापालिकेवर ठिय्या आंदोलन, घोषणांनी परिसर हादरला!
महिलांनी हातात हंडे घेत ‘ठिय्या आंदोलन’ छेडत मनपाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली –

BREAKING | “पाणी आमचा हक्क आहे!” – केडगावातील महिलांचा महापालिकेवर ठिय्या आंदोलन, घोषणांनी परिसर हादरला!
केडगाव, प्रभाग क्रमांक १७ – स्वच्छतेचं ढोंग, पाण्याचं दुर्लक्ष आणि निष्क्रिय प्रशासनाविरोधात आज केडगावातील महिलांनी संतापाची ठिणगी उडवली! रोजच्या पाण्याच्या थेंबासाठी होणारी धावपळ, गल्लीबोळांतील दुर्गंधी, आणि १५ दिवसांनी येणारी कचऱ्याची गाडी – या साऱ्याचा विस्फोट अखेर झाला!
महिलांनी हातात हंडे घेत ‘ठिय्या आंदोलन’ छेडत मनपाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली –
“पाणी आमचा हक्क आहे!”
“महापालिका झोपलीये!”
“कचऱ्याचा नाय नाय!”
आंदोलनात अनिता दाते, सोनाली बोरुडे, सविता हुलगे, आरती सरोदे, अलका कोतकर, सीमा हुलगे यांसह अनेक महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला. आंदोलनाचं नेतृत्व महेश सरोदे आणि श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट यांनी केलं.
“महिन्यांमहिने सहन केलं, निवेदनं दिली, पण प्रशासन फक्त आश्वासनं देतं – आता कृती हवी!” असा संतप्त सूर महिलांनी व्यक्त केला.
पाण्याची समस्या – 6 ते 8 दिवसांनी येणारं पाणी, तेही इतक्या कमी दाबाने की वापरण्याआधीच संपतं!
कचरा संकट – 10-15 दिवसांनी कचरागाडी, रस्त्यावर कुजलेला कचरा, आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम!
मनपाचा बिनधास्त प्रतिसाद – “कचरा संकलनाचं टेंडर प्रक्रियेत आहे, पण पाणीपुरवठा लगेच सुरळीत करू” – एवढंच आश्वासन!
पण महिलांचा निर्धार ठाम – “फक्त बोलून चालणार नाही, कृती हवी!”
या ठिणगीने प्रशासनाला आता जाग येणार का? की पाणी आणि कचऱ्यासारख्या मूलभूत गरजांसाठी अजूनही नागरिकांना संघर्षच करावा लागणार?
ही बातमी शेअर करा!
आपल्या भागात अशीच स्थिती असेल तर आवाज उठवा!
#केडगाव #पाणीआमचाहक्क #महापालिकेचंढोंग #SwachhBharat_RealityCheck #MetroNewsVirals 

