बलुतेदारांचे कार्य प्रगतीपथावर

ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या विभागप्रमुख पदी रोकडे , कुसाळकर, सैंदर, अहिरे यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी):
     नगर शहर ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या विभाग प्रमुख पदी रोकडे , कुसाळकर , सैंदर , आहिरे यांची निवड करण्यात आली. शहराध्यक्ष अनिल इवळे यांच्या सहीने या सर्वाना नियुक्ती पत्रे देण्यात आली. महासंघाचे जिल्हाध्यक्ष माउली मामा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली वितरण झाले .
     नगर जिल्ह्यातील ओबीसी बारा बलुतेदार महासंघ अतिशय चांगल्या प्रकारे  काम करीत आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील सर्व जाती बांधवांची एकजूट करीत आहे. यामुळे नगर शहर व जिल्ह्यातील बारा बलुतेदाराचे संघटन माजुबत होत आहे. याच पद्धतीने संघटनेची वाटचाल पुढे यशस्वीपणे चालू ठेवण्यासाठी नगर शहरात विविध उपनगरात विभाग प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. अशी माहिती गायकवाड यांनी दिली .  त्याची घोषणा एका छोटेखानी समारंभात करण्यात आली.

पाईप लाईन रोडवरील हॉटेल सागर  समोरील माउली इस्टेट एजन्सीच्या दालनात हा छोटा कार्यक्रम झाला . यावेळी सोशल डिस्टंसीग चे सर्व नियम पाळण्यात आले . यावेळी केडगाव उपनगराच्या विभाग प्रमुखपदी किशोर रोकडे, सावेडी उपनगराच्या विभागप्रमुखपदी संजय अंबादास सैंदर , बननराव कुसाळकर तर भिंगारच्या विभागप्रमुखपदी नाना आहिरे यांची निवड करण्यात आली.           या सर्वाना जिल्हाध्यक्ष गायकवाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी विजयशेठ काळे, शहर उपाध्यक्ष श्याम औटी, जिल्हा उपाध्यक्ष संदीप घुले , संतोष भालेराव , बाळासाहेब पालवे , आदिनाथ गायकवाड , मल्हारी गीते , सचिव मनोज खोडे , विनायकराव पालवे , योगेश पिंपळे , सय्यद मन्सूर , म्हस्के, मकरंद घोडके, प्रसाद शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.