रसाळ विश्वसनीय आंब्यासाठी पाचवी पिढी लोढा मँगो हाऊस निलेश प्लॅटिक तेलीखुंट सकल शॉपिंग महोत्सवात जामगांवकर लोढ़ा मँगो नावाने १२ नंबरचा स्टॉल

आंबा विक्रीत पोपट हस्तीमल लोढा हे जुने जाणते नाव

अहमदनगर (प्रतिनिधी)

 

               नगर मध्ये रसाळ, गोड, चविष्ट आणि विश्स्वसनीय आंब्यासाठी परंपरेनुसार चालत आलेली पाचवी पिढी म्हणून लोढा मँगो हाऊस निलेश प्लास्टिक तेलीखुंट ही सर्वात जुनी आंबा पेढी म्हणून ख्यातनाम आहे. येत्या ७,८,९ आणि १०  एप्रिल या कालावधीत पार पडणाऱ्या सावेडी नाका येथील सावेडी बस स्थानक, जुन्या नाक्या समोर असलेल्या मैदानातिल सकल शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये देखील आपणास लोढा यांच्या आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.

 

 

 

 

 

                या ठिकाणी १२ क्रमांकाचा हा स्टोल असणार असून तिथे जामगांवकर लोढा  मँगो हाऊस नावाने हा स्टोल असणार आहे. या स्टोल चे मालक पोपट हस्तीमल लोढा हे या आंबा विक्री क्षेत्रातील अतिशय जुने जाणते नाव आहे. आता तेलिखुन्त येथे हा व्यवसाय त्यांचे दोन्ही सुपुत्र स्मितम अणि विपुल लोढा हे संभाळत आहे.

 

 

 

 

 

 

                            या वर्षी आंब्याचा सिझन सुरु झाला आणि आंब्याची पहिली पेटी नवीपेठेत दाखल झाली. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात लोढा यांच्या पेढीवर, हापूस, पायरी, लालबाग, केशर अशा विविध प्रकारच्या आंब्याच्या गाड्या निलेश प्लास्टिक येथे खाली होत राहिल्या आणि त्यांचा विश्वसनीय असा आंबा हातोहात विकला जाऊ लागला. प्युअर स्वीट हापूस आंबा कधीच स्वस्त नसतो. आजकाल तीनशे चारशे रुपये डझनवर जो आंबा विकला जातो तो डुप्लिकेट हापूस असतो.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा.

 

 

 

                              कोकण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग येथून येणारा आंबा हा १०० टक्के सोने आहे तर डुप्लिकेट आंबा हा मैसूर, बेंगळुरू कर्नाटक येथून येतो त्याच्या आणि याच्या रंगात आणि चवीत जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा ग्राहकांनी स्वस्तातला आंबा घेतला म्हणजे त्यांची ही सपशेल फसवणूक आहे हे सर्वानी लक्षात ठेवा असे आवाहन लोढा यांच्या पाचव्या पिढीतील आंबा विक्रेते स्मित पोपट लोढा यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

                    नगरची गुलटेकडी अशी ओळख असलेल्या नवीपेठेत आंबा दाखल झाला की  आंबा खाण्याचा शौक ठेवणारे लोक येथे गर्दी करतात तेव्हा ते आवर्जून उच्च प्रतीचा आंबा टेस्ट खरेदी करण्यासाठी वाट वाकडी करून तेलीखुंट पॉवर हाऊस च्या बाजूला असलेल्या निलेश प्लॅस्टिक या दुकानात डोकावतात. तिथे सुटलेला पिकलेल्या आंब्याचा घमघमाट पाहून ते तेथेच काही काळ रेंगाळतात आणि आवर्जून नंबर वन ग्रेडचा आंबा आवडीनुसार खरेदी करतात.

 

 

 

 

 

 

 

 

                      नगरकरांनी या पेढीला आवर्जून एकदातरी भेट द्यावी किंवा दिनांक ७ ,८ आणि ९ आणि १०  एप्रिल या दिन दिवसांच्या काळात सावेडी नाका मैदानात पार पडणाऱ्या जामगांवकर लोढा मँगो या १२ व्या क्रमांकाच्या स्टोलला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.