आपल्या पायावर उभे राहण्याचा एक वेगळा मार्ग ..

बाईकवर गावोगावी फिरून ट्यून करून देतात वाद्ये

अहमदनगर (प्रतिनिधी)

 

कुठे नगर आणि कुठे मध्यप्रदेशातील जबलपूर हे शहर … हे युवक पिढ्यानपिढ्या हार्मोनियम दुरुस्तीचा व्यवसाय करीत आहेत. आणि आपल्या पायावर उभे राहण्याचा आपली पोटाची खळगी भरण्याचा एक वेगळा मार्ग या कलाकारांना त्यांच्या पूर्वजानी दिला आहे. तो म्हणजे हार्मोनियम दुरुस्तीचा ..

 

 

 

मध्यप्रदेशातील जबलपूर पासून पुढे असलेल्या एका शहरातून हे दोन युवक थेट अहमदनगर येथे प्रसिद्ध हार्मोनियम वादक प्रकाश शिंदे यांच्या घरी आले आहेत. आणि ते त्यांच्या हार्मोनियम ची दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि ट्युनिग अतिशय अल्प दरात करून देत आहेत. अशाच प्रकारे ते जबलपूर हुन निघतात आणि एकेक गावी जात त्या शहरातील कलाकारांना भेटून त्यांची हार्मोनियम तसेच इतर वाद्ये दुरुस्त करून देतात.

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा. 

 

 

महाराष्ट्रात आणि गोव्यात यांनी विविध गावात जाऊन मोठंमोठ्या कलाकारांच्या हार्मोनियम दुरुस्त करून दिल्या आहेत. यात देवकी पंडित, अंगद गायकवाड, प्रमोद रानडे,  प्रमोद मराठे तन्मय देवचक्के ,धनश्री खरवंडीकर, अजित वाडेकर या दिग्गज कलाकारांच्या हार्मोनियम ते दरवर्षी दुरुस्त करून देतात.