मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 6 वाहने एकमेकांवर आदळली; अपघातात 3 ठार , 6 जखमी

खोपोली जवळ बोरघाटातील घटना

 

 

                          मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोलीजवळ बोरघाटात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात तिघेजण ठार झाले तर 6 प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई लेनवर कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढच्या टेम्पोला धडक दिली . 2 टेम्पो , 2 कार, खाजगी बस आणि ट्रेलर अशी 6 वाहने या अपघातात एकमेकांवर आदळली.  अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळित झालेली वाहतूक आता सुरळीत आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

 

 

हे ही पहा आणि सब्स्क्राइब करा.

 

 

                             खोपोली येथे झालेल्या या भीषण अपघातामध्ये एका कारचा दोन मोठ्या वाहनांमध्ये चक्काचूर झाला आहे. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईकडे येणाऱ्या कोंबड्यावाहू टेम्पोची बसला धडक बसली आणि यानंतर मागची वाहनंही एकमेकांवर आदळली.सदर अपघातानंतर लगेचच बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आणि अपघातग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली. यानंतर जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं