नगरकरांनी लसीकरणाकडे फिरवली पाठ ! 

जिल्ह्यात १३ लाख नागरिक अद्यापही कोरोना लसीकरणापासून वंचित

नगर (प्रतिनिधी) : पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेकांना आपले आप्त, मित्र, घरातीलं सदस्य गमवावे लागले.

केंद्र सरकार कडून मर्यादित प्रमाणात लसीचा पुरवठा होत असल्याने लास घेण्यासाठी झुंबड उडत होती.

प्रसंगी नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली, गोंधळ घातला. प्रसंगी आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्लेही केले.

आता कोव्हीड लसीचा मुबलक साठा उपलब्ध असूनही लसीकरण केंद्रे ओस पडली आहेत .

लसीकरण कॅम्प , घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत असतानाही त्याला पाहजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे . संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता , प्रशासन ऍक्शन मोड वर असताना नागरिक ‘ऑफ मोड’ वर जात आहे .

कवच कुंडल या मोहिमेत दोन लाख १२ हजार नागरिक लसवंत झाले आहेत . दिलेली उद्दिष्टे गाठन्यात प्रशासन कमी पडत असल्याचे दिसते आहे .

दुसऱ्या डोसचा कालावधी कमी करण्याची गरज  कोव्हिशिल्ड चा पाहिला डोस  घेतल्यानंतर दुसऱ्या डोस साठी ८४ दिवसांची वाट पाहावी लागते .

हा कालावधी खूप मोठा असल्याने लस उपलब्ध असूनही दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे २३ टक्के आहे . कालावधी कमी केल्यास दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढवून उद्दीष्ट्यपूर्तीच्या जवळ जिल्हा पोहचू शकतो