संगमनेर – पिडीत मुलगी इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत असताना क्रिकेट खेळणाऱ्या एका मुलाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसविले. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो असे म्हणत त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २०२० मध्ये सुरू झालेला हा प्रेमाचा प्रकार १० वी आणि १२ वी होईपर्यंत फोन, चॅटिंग आणि भेट यापुढे गेला नव्हता. परंतु, मुलगी बी फार्मच्या दुसऱ्या वर्षात गेली असता, आरोपीने तिचे अपहरण करत थेट गुंगीचे औषध देऊन मुंबईला नेले. तेथे एका लॉजवर अनेकदा अत्याचार करुन तिच्याशी लग्न केले. मात्र, ९ वी ते बी फार्मसी या दरम्यान जे काही उद्योग झाले होते. त्याचे काही अश्लिल फोटो आरोपीकडे होते. तुझ्या घरच्यांना फोटो पाठवतो, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करतो, अश्या धमक्या आरोपी पिडीतेला देत राहीला. परंतु मुलगी पोलीस ठाण्यात आली असता, मुलीने जे काही घडले ते सविस्तर पोलिसांपुढे कथन केले. त्यानंतर मुख्य आरोपी शादाब तांबोळी (रा. आंबी खालसा, ता.संगमनेर), युसूफ चौघुले, कुणाल शिरोळे व आयाज पठाण (तिघेही रा. आंबी खालसा, ता. संगमनेर) या चौघांवर घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2020 मध्ये शादाब तांबोळी आणि युसुफ चौगुले हे आंबी खालसा येथे आले होते. तेव्हा युसूफ माझेशी गोड- गोड बोलुन शादाब हा चांगला मुलगा आहे, तो तुझ्यावर मनापासुन प्रेम करतो, तु पण त्याच्यावर मनापासुन प्रेम कर असे म्हणुन पिड़ीतेला भावनिक केले होते. पिडीता देखील त्याच्या बोलण्याला बळी पडुन शादाबशी बोलू लागली. फेब्रुवारी 2020 मध्ये पिडीता व शादाब एका ठिकाणी भेटले तेव्हा त्याने पिडीतेचे बळजबरी चुंबन घेतले. त्यावर पिडीतेने मला असे वागणे आवडत नाही, असा विरेध दर्शविला होता. दरम्यान, शादाब हा पीडित मुलीस भेटतो, यांचे काहीतरी चालु आहे. ही गोष्ट मुलीच्या घरच्यांना माहीत झाली होती. त्यामुळे पिडीतेची आई व चुलत भाऊ यांनी शादाब याला समजावुन सांगितले होते. त्यानंतर शादाब याने तिला भेटणे बंद केले. मात्र अधुन मधुन त्याचे प्रेम उफाळून आले. की तो तिला मिसकॉल देणे, फोन करणे किंवा मॅसेज करणे असले उपद्याप करत असे. दरम्यान, संगमनेर सोडल्यानंतर याचा पिछा सुटेल असे पडीतेला वाटले. व तीने संगमनेरच्या बाहेर बी. फार्मसी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. परंतु, त्यानंतर देखील तो वारंवार पिडीतेशी संपर्क करत राहीला. पिडीतेने कॉल केला नाही किंवा रिप्लाय दिला नाही. तर तो त्याच्याकडे असलेले फोटो हे घरच्यांना दाखवेल, तुझी बदनामी करील अशा धमक्या वारंवार देत होता. त्यानंतर शादाब आणि त्याचा मित्र युसुफ चौगुले हे दोघेही वारंवार येवुन पिडीतेला भेटत असे. शादाब व युसुफ यांच्या त्रासाला कंटाळल्याने पिडीतेने शादाबच्या नावाने चिठ्ठी लिहुन आत्महत्या करेन अशी धमकी दिली. मात्र, तरी देखील त्यांचा त्रास कमी झाला नसल्याने पिडीता कायम दडपणाखाली जगू लागली व मानसिक त्रासाचा सामना पिडीतेला करावा लागला. दरम्यान पिडीतेने शादाबला हे कोठेतरी कायमचे थांबले पाहिजे अन्यथा मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले. यानंतर ७ जुलै २०२४ रोजी पिडीता घरुन हॉस्टेलकडे जाण्यासाठी निघाली असता शादाब याने पिडीतेला मंचर याठीकाणी भेटीसाठी बोलावले व पुणे कोर्टात जाऊन वकिलाशी सविस्तर बोलु व कायमचे वेगळे होऊ असे सांगितले, परंतु पिडीतेला त्यांच्या वागण्याचा संशय आल्याने पिडीतेनेपुढे जाण्यास विरोध केला मात्र शादाब व युसुफ या दोघांनी पिडीतेला दमदाटी सुरु केली. आवाज केल्यास तुला इथेच संपवुन टाकु अशी धमकी देखिल यावेळी शादाब व युसुफ या दोघांनी दिली. यानंतर आरोपी युसुफ याने पिडीतेला पाणी पिण्यास दिले व पिडीतेला चक्कर येऊ लागली. युसुफने पाजलेल्या पाण्यात काहीतरी गुंगीचा पदार्थ असल्याने पिडीतेची अर्धवट शुद्ध हरपली होती. त्यानंतर गाडी थेट मुंबईला गेली. तेथे आदिल नावाच्या माणसा बरोबर शादाब व गाडीत असणारा दुसरा अनोळखी इसम बोलु लागले. त्यावर त्या आदिल नावाचे इसमाने युसुफ यास फोन केला व म्हणाला हे लचांड माझ्याकडे का पाठविले त्या मुलीची परिस्थिती चांगली नाही. उगीचच झनझट निर्माण होवुन अडचणी तयार होतील. त्यानंतर त्यांनी पिडीतेला सानपाडा येथील एका हॉटेलमध्ये पाठविले. रात्री शादाब याने त्याच्याकडे असलेले फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची दमबाजी करत बळजबरीने रात्री वेळोवेळी शारिरीक सबंध प्रस्थापित केले. आता जे घडले हे कोणाला सांगितले तर मी तुला व तुझ्या कुटुंबाला संपुण टाकील, अशी धमकी देखिल दिली. यानंतर दि. 10 जुलै 2024 रोजी पहाटेच 05 वाजताच्या दरम्यान हॉटेल वाल्याने शादाब यास उठविले आणि विचारले की, बाहेर तुम्ही गाडी बोलाविली आहे का ? त्यावर शादाब याने आलेल्या गाडीवाल्याकडे चौकशी केली असता सदरची गाडी युसुफ चौगुले याने पाठवली असल्याचे समजले. शादाबने मुलीला बळजबरीने पळवुन नेले असल्याने नगर व संगमनेरला प्रकरण फार तापले आहे. असे गाडीवाल्याने सांगितले. त्यानंतर त्या गाडीतून पिडीतेला व शादाबने एस.पी. ऑफीसला नेले. तेव्हा युसुफ चौघुले याने पाठवलेल्या माणसांनी शादाब विरुद्ध एकही शब्द बोलल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला संपुण टाकु अशी दमदाटी केली. त्यानंतर तु फक्त घारगांव पोलिस स्टेशनला गेल्यानंतर तेथील पोलीसांसमोर व घरच्यांसमोर काहीही झाले तरी शादाब सोबत रहायचे आहे. एवढेच वाक्य बोलण्यास पिडीतेला सांगितले गेले. त्यानंतर तेथील एका अधिकाऱ्याने शादाबकडे चौकशी केली असता शादाबने मी हिचे बरोबर लग्न केले असे खोटे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीने जो काही घटनाक्रम होता. तो घारगाव पोलीस ठाण्यात कथन केला. त्यानुसार घारगाव पोलीस ठाण्यात शादाबसह चौघांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.