अहमदनगर (प्रतिनिधी) :
वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवार दि १ डिसेंबर रोजी मुख्य कार्यालयातून अधिकृतपणे जाहीर केली आहे.
नवीन कार्यकारिणी मध्ये अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून प्रतिक बारसे (अध्यक्ष) व योगेश साठे (महा सचिव) यांच्या बरोबरच ५ उपाध्यक्ष, ३ सचिव, ६ संघटक, ३ सल्लागार व १ प्रसिद्धी प्रमुख अशी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाने प्रतिक बारसे (जिल्हाध्यक्ष – अहमदनगर दक्षिण), योगेश साठे (महासचिव – अहमदनगर दक्षिण), सुरेश कोंडलकर (कर्जत), योगेश सदाफुले (जामखेड), अरविंद सोनटक्के (पाथर्डी), बंन्नो शेख (शेवगाव), संतोष गलांडे (श्रीगोंदा) अशा ५ उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चंद्रकांत नेटके (कर्जत), सुनिल बाळू शिंदे (श्रीगोंदा), बाळासाहेब कांबळे (नगर तालुका) असे ३ सचिव तसेच फिरोज पठाण (नगर शहर), नंदकुमार गाडे (कर्जत), भीमराव चव्हाण (जामखेड), दत्तात्रय अंदुरे (पाथर्डी), सुरेश खंडागळे (शेवगाव) अशा ६ संघटकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे प्रा. जीवन पारधे (अहमदनगर शहर), चंद्रकांत डोलारे (कर्जत), वसंत नितनवरे (श्रीगोंदा) अशा ३ सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भगवान राऊत यांची प्रसिद्धी प्रमुख पदी फेर नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा कार्यकरिणीमध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान ५ कार्यकर्त्यांचा समावेश करून जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी अहमदनगर दक्षिण मधील तालुकाध्यक्षांनी लवकरात लवकर आपापल्या तालुक्यातील ५ कार्यकर्त्यांची नावे मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावीत तसेच संपूर्ण जिल्ह्यातील शहर, तालुका, गाव, गण, यासाठी देखील कार्यकर्त्यांची नावे मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावीत असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे व महासचिव योगेश साठे यांनी केले आहे.
वरील सर्व कार्यकारिणी मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक स्तरावर समित्या नियुक्त करतांना तालुका, गण, गट, वार्ड, वार्ड प्रतिनिधी अशी रचना असणार आहे. सदर जिल्हा कार्यकारिणीची यादी पदनिहाय प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादीतील पदाधिकाऱ्यांशीवाय इतर सदस्यांना खातेनिहाय जबाबदारी जिल्हा समितीच्या प्रथम सभेत देण्यात येतील तर उर्वरित कार्यकर्त्यांची नावे नगर परिषद स्तरावरील समितीमध्ये घेण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे व महासचिव योगेश साठे यांनी कळविले आहे.