संविधान जागर यात्रेत दोन उद्देशिकांचे वाचन
संविधान जागर समितीच्या वतीने आयोजित संविधान जागर यात्रा २०२४ आज नगर शहरांमध्ये आली होती. या यात्रेच्या वतीने आज भव्य सभेचे आयोजन सहकार सभागृह अहिल्यानगर येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमास समाजातील दलित वंचित घटकाचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात, आयुक्त आकाश अंभोरे यांच्या कडून दोन प्रकारच्या उद्देशिकांचे वाचन करून झाले, पहिली डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली उद्देशिका तर दुसरी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी दरम्यान नव्याने तयार केलेली उद्देशिका अशा दोन उद्देशिका वाचण्यात आल्या. यात्रेमध्ये सर्वप्रथम श्रीमती योजना ठोकळे यांनी देशात ७० वर्षांची घराणेशाही उलथवून सर्व सामान्यांना सत्तेची चावी मिळणे, केवळ संविधानामुळे शक्य झाले आहे असे ते म्हणाले. तर दुसरा ठराव श्रीमती स्नेहा भालेराव यांनी नोकरीतील पदोन्नती व नवबौध्द आरक्षण इंदिरा गांधी यांनी रोखले होते, ते अटलजी यांच्या द्वारे सुरवात करण्यात आले आणि आरक्षणची मुदतवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचे अभिनंदन करण्याबाबत केला, तर तिसरा ठराव आयुक्त राजेंद्र गायकवाड यांनी भारत असाच संविधानाच्या मार्गाने प्रगती करत राहिला तर बाबासाहेबांच्या विचारनुसार भारत लवकरच महासत्तेच्या दिशेने वाटचाल करेल या विषयांवर मांडला.
यात्रेच्या मुख्य भाषणामध्ये ॲडव्होकेट वाल्मीक तात्या निकाळजे यांनी भारतात आता संविधनिक राज्य आले आहे. तेव्हा सर्वजण आपापले सर्व व्यवहार संविधानिक नियमांनी करीत आहे. जर बाबासाहेबांनी इथले जुने कायदे १०० वर्षापूर्वी सोडून आता संविधनिक नियम स्वीकारले तर मुस्लिम त्यांचे शरीयत कायदे अजून किती दिवस संविधानाच्या विरोधात सुरू ठेवणार आहेत? मुस्लिमांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष का जन्माला येत नाही? शरीयत सोडून संविधान स्वीकारण्याचे काम जर यापुढे मुस्लिमांना जमणार नसेल, तर संविधान जागर समिती हे काम करेल. संविधान बदलणार असे म्हणने बाबासाहेबांच्या संविधानाला कूचकामी म्हणण्यासारखे आहे, अशी मते त्यांनी व्यक्त केली. यात्रेत संविधान जागर समितीने नव्याने लिखाण केलेले “कधीच न बदलणारे संविधान व त्याच्या हत्येचा प्रयत्न करणारी काँग्रेस” या विषयाचे पुस्तक आणि मागील कालखंडात मुस्लिमांकडून दलित वंचितांवर झालेल्या अन्यायाच्या घटनांचा रिपोर्ट समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आला.
यात्रेमध्ये बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मिकी आणि बुरुड अशा विविध समाजातील लोकांनी मोठया संख्येने उपस्थिती लावली होती. यात्रेचा समारोप हा सर्वांनी सामूहिकरीत्या संविधान जागर गीत म्हणून केले आणि झालेल्या विषयांबाबत समाधान व्यक्त केले. संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन आयुक्त नागसेन पुंडगे यांनी केले तर सभा यशस्वी होण्यासाठी स्थानिक चंद्रकांत काळोखे, रजनीकांत भोसले, निशांत ननावरे तसेच या कार्यकर्त्यांसमवेत यात्रेतील आयुक्त संतोष गवळी, आयुक्त संजय भालेराव, पंकज सुरवसे, अशोक गायकवाड, भरत ओव्हाळ यांनीही विशेष प्रयत्न केले.