अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने वाडिया पार्क महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण.
देशामध्ये सरकारी कार्यालयात सामान्य नागरिकांना प्रत्येक कामासाठी लाच द्यावी लागते ती बंद करण्यास पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अपयशी ठरल्याने त्यांनी पदाचे राजीनामे द्यावे- विलास कराळे.
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशामध्ये व महाराष्ट्र मध्ये केंद्र सरकारचे कार्यालय महाराष्ट्र सरकारचे कार्यालय व सर्व सरकारी कार्यालयात दलालमार्फत साखळी पद्धतीने आर्थिक लूट केली जाते. व अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या व आवारामध्ये दलालाचा अड्डा झालेला आहे दररोज 21 दलाल येथे एजंटगिरी करतात व परिवहन अधिकारी लेखी देतात अधिकृत दलाल नाहीत मग हे लोक वर्षानुवर्ष दलाली कशी करतात नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांची अडवणूक करून साखळी पद्धतीने आर्थिक लूट करतात अहमदनगर येथील सरकारी दवाखान्यातून बोगस अपंगाचे प्रमाणपत्र वाटप केले जाते जिल्हा परिषद शिक्षण विभाग बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या 74 शिक्षकांवर पाठीशी घालत आहे कित्येक खोट्या अपंग प्रमाणपत्र धारकांनी शासनाची आर्थिक लूट फसवणूक केलेली आहे त्याच्या सर्वांच्या चौकशी करून त्यांच्यावर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावे व महाराष्ट्रामध्ये शेतीच बिगर शेतीचे बंगले प्लॉट फ्लॅट दुकाने सातबाराचे उतारे आधारशी लिंक करा शेतीचे उत्पन्न 50 लाखाच्या पुढील शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लागू करावा म्हणजे भ्रष्ट नेते अधिकारी यांच्या भ्रष्टाचार उघड होईल राज्यामध्ये केमिकल युक्त भेसळीचे दूध दूधजन्य पदार्थ राज्य मध्ये राजरोसपणे विक्री केली जाते यावर नाममात्र कारवाई केली जाते नाही अहमदनगर महानगरपालिका नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरलेल्या आहेत तेथे मोठ्या भ्रष्टाचार झालेला आहे सर्व आजी-माजी आयुक्तांच्या मालमत्तेच्या चौकश्या केंद्रीय तपास यंत्रणा कडून करण्यात यावे व सेतू केंद्र चालक सरकारने नियमावली दिलेली असताना नागरिकांची पाचपट आर्थिक लूट करतात पैशाची पावती दिली जात नाही दर फलक लावले जात नाही या मागणीसाठी वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण करताना अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष विलास कराळे पाटील समवेत सरचिटणीस गोरख खांदवे, पोपट साठे, रावसाहेब काळे, बबलू खोसला, अशोक औशीकर, जुनेद बागवान, गोरख खांदवे, अन्वर शेख, अजय पेद्रांम, सतीश भोबाळ, गोरख शिंदे आधी उपस्थित.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कार्यालयामध्ये साखळी पद्धतीने चालू असलेली नागरिकांची वाहन धारकांची आर्थिक लूट थांबवावे व कार्यालयामध्ये आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये ई सेवा केंद्र सेतू केंद्र इतर सेवा केंद्र नागरिकांची विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करतात शासनाने प्रत्येक दाखल्यासाठी 36 रुपये 60 पैसे ठरवून दिले आहे मात्र सेतू केंद्र चालक पाचपट पैसे घेत आहे व देशातील व महाराष्ट्रातील शेत जमीन बिगर शेती जमीन प्लॉट फ्लॅट बंगले दुकाने याचे सातबारा उतारे आधारशी लिंक करण्यात यावे व शेतीवरील 50 लाख रुपये उत्पन्नाच्या पुढील उत्पन्न कमावणाऱ्या शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लागू करण्यात यावा व सरकारी दवाखान्यात साखळी पद्धतीने पैसे घेऊन अपंगाचे प्रमाणपत्र वाटप झालेले आहे त्यांच्या मालमत्तेच्या चौकशी सीबीआय इन्कम टॅक्स ई डी या विभागाकडून करून कारवाई करण्यात यावी व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केलेली आहे त्या सर्व संशयित गुन्हेगारावर कारवाई करावी अहमदनगर जिल्हा पुरवठा विभागामध्ये नागरिकांना शिधापत्रिका काढण्यासाठी सरकारी कर्मचारी अडवणूक करून दलालाकडे जाण्यास भाग पाडत साखळी पद्धतीने पाच हजार रुपयाची मागणी करून लूट करत आहे याची चौकशी करण्यात यावी व अहमदनगर महानगरपालिकेने नागरिकांना मूलभूत सुविधा दिलेल्या नाहीत राज्य सरकारने ज्या पण आयुक्त उपायुक्त नगररचनाकार वर्षानुवर्ष एकाच टेबलावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सगम मताने अहमदनगर शहरातील नागरिकांच्या पैशाची लूट केल्याची शक्यता असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी व सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी यांची सर्व सरकारी कार्यालयाकडून होणारी लूट मुख्यमंत्री हे थांबू शकले नाही ते त्यामध्ये अपयशी ठरले आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री शिंदे व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा व महाराष्ट्रातील दूध भेसळ केमिकल युक्त दूध याच्यावर कारवाई करून प्रामाणिक दूध उत्पादकांना योग्य दर द्यावा व दूध भेसळाचा पूर्ण नायनाट करण्यात यावा व या सर्व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास करण्यात यावे व कडक कारवाई यांच्यावर करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात आले