बदलापूर येथे अत्याचारातील नराधमाला फाशीची शिक्षा द्या ! 

 बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मेहेर इंग्लिश स्कूलचा शहरातून मुकमोर्चा  

अहमदनगर : बदलापूर ठाणे येथे एका नामांकित शाळेचे चार वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेले घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या घटनेचे नगर शहरातही तीव्र निषेध उमटत आहे. शाळेतील मुलींचा संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलकडून नगर शहरातून मुका मोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चाचे नेतृत्व तीन वर्षाच्या गनिष्का चिलका हिने केले. हा मूकमोर्चा दादा चौधरी विद्यालयातून पटवर्धन चौक, लक्ष्मी कारंजा, नवी पेठ, शहर बँक चौक, नेता सुभाष चौक, चितळे रोड मार्गे, चौपाटी कारंजा आणि दादा चौधरी विद्यालय येथे समारोप करण्यात आला. या मुकमोर्चात शाळेतील विद्यार्थी, पालक माता, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी फीत लावून या घटनेचा निषेध केला. अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी. महिलांना शाळेत, मंदिर, पोलीस स्टेशन, शासकीय कार्यालयामध्ये नोकरी करत असताना, खाजगी ठिकाणे संस्थेच्या ठिकाणी तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी संरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. असे प्राचार्या प्रा.अनुराधा झगडे यांनी सांगितले .याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनिल निकम, कु.गनिष्का चिलका, शाळेतील शिक्षिका सत्यश्री चिलका, गीता वल्लाकट्टी, शितल दळवी, गायत्री भुसा, मोहिनी नराल, रितू सोनवणे, आशा घोरपडे, अनिरुद्ध देशमुख आदी उपस्थित होते. मेहेर इंग्लिश स्कूलच्या सर्व महिला शिक्षिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे.