पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी समर्थ सूर्यवंशी याची निवड
नगर (प्रतिनिधी)- नुकत्याच धुळे येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. होती या राज्यस्तरीय स्पर्धेमधे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून वयोगट १४ वर्षाखालील चि.समर्थ विलास सूर्यवंशी या खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक पटकाविले व तसेच पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. समर्थ सूर्यवंशी हा गेल्या ५ वर्षांपासून अचिव्हर्स स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये कराटे प्रशिक्षण घेत आहे. या खेळाडूला त्याचे मुख्य प्रशिक्षक सेन्सई आदित्य क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याचप्रमाणे सेन्सई बाबू सकट, सेन्सई सर्फराज सय्यद, सेन्सई सुरज गुंजाळ व सहप्रशिक्षक आशिष केदारी, कुशल मेस्त्री, प्रसाद निर्मल, अदिती होले यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेसाठी समर्थला अचिव्हर्स स्पोर्ट्स अकॅडमी कडून व सर्व प्रशिक्षांकडून शुभेच्छा देण्यात आले व या कामगिरीबद्दल समर्थ सूर्यवंशी चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.