अडीच हजार कोटींच्या खर्चातून नगर – मनमाड महामार्ग पूर्ण करा; केंद्रीय मंत्री गडकरी
अहिल्यानगर : मनमाड महामार्गावरील विळद ते सावळीविहिरी दरम्यान रखडलेल्या महामार्गाबाबत संसदेत खासदार नीलेश लंके यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग अटी शिथिल करून पंधरा दिवसात निविदा प्रसिद्ध करून अडीच हजार कोटींच्या खर्चातून महामार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. नगर – मनमाड महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या महामार्गाबाबत खासदार नीलेश लंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. शुक्रवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी या प्रश्नावर संसदेत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली. या रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे ही मागणी लंके यांनी केली आहे. त्याचा उल्लेखही गडकरी यांनी आपल्या निवेदनात केला. गडकरी यांनी सांगितले की, नगर-शिर्डी रस्त्याचे काय झाले माहिती नाही, परंतू या रस्त्याच्या कामाच्या ३ निविदा निघाल्या. तीन ठेकेदार पळून गेले. एकाची बँक गॅरंटी बनावट निघाली. आता पुन्हा दोनच ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्यानंतर या निविदा रद्द करण्यात सांगण्यात आले आहे. आता पंधरा दिवसांची कालावधीची निविदा प्रसिध्द करून सुमारे अडीच हजार रूपये खर्चाचा हा प्रकल्प पुर्ण केला जाईल, असे आश्वासन दिले. शिर्डीला भाविक येतात. त्यांना त्रास सहन करावा लागतो त्याचे मलाही दुःख होते आहे. तांत्रिक आणि आर्थिक निकष होते त्यात काही अंशी शिथिलता आणण्यात आली आहे, असे गडकरी यांनी सांगितले.