पुणे :
एमपीएससी चे वेळापञक जाहीर करण्याची मागणी ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने पुण्यात घेतलेल्या पञकार परिषदेत करण्यात आली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष सेनेने दिला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अभियांत्रिकी पुर्व परीक्षा,दुय्यम सेवा अराजपञित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर काहींनी आत्महत्येचा मार्ग स्विकाराला आहे. जे विद्यार्थी पास झालेत त्यांना जाँईनींग लेटर मिळत नाही, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने एमपीएससी चे वेळापञक जाहीर करावे अशी मागणी ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.