बाबावाडीतील विद्यार्थ्यांसाठी ऊबदार चादरांची भेट

वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज - विठ्ठलराव माने

नगर (प्रतिनिधी)- समाजातील आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. वंचित घटकातील मुलांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज आहे. विविध सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना आधार मिळणार आहे. उपेक्षितांना केलेली मदत हेच जीवनातील समाधान असल्याचे प्रतिपादन विठ्ठलराव माने यांनी केले.
विठ्ठलराव माने परिवाराच्या वतीने शहरातील बाबावाडीतील विद्यार्थ्यांसाठी ऊबदार चादरांची भेट देवून मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हमालपंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, माजी नगरसेवक आसाराम कावरे, चंद्रकांत ओव्हळ, यशवंत ओव्हळ, महादेव राजळे, रमेश आगरकर, अक्षय काकिर्डे, चारुदत्त जगताप, मयूर शेजवळ, संजय कांबळे, रवींद्र जाधव, राहुल सपाटे, कृष्णा आकसाळ, यश माने, जय माने, अनिल मोढवे, संजय माने आदी उपस्थित होते.
अविनाश घुले म्हणाले की, वंचित घटकातील मुलांना प्रवाहात आणण्यासाठी विठ्ठलराव माने यांचे सामाजिक योगदान कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने उपेक्षित व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास सामाजिक बदल घडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.