अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित विश्‍वकोश आणि नामवंत लेखकांचा पुस्तक प्रदर्शन

पुस्तकांच्या विश्‍वात रमली बालके...

नगर – अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित विश्‍वकोश आणि नामवंत लेखकांच्या पुस्तक प्रदर्शनास असंख्य विद्यार्थ्यांनी भेट देऊन वाचनाचा आनंद घेतला.
मोबाईल व तंत्रज्ञानाच्या युगात बालकांच्या हाती पुस्तके आणि त्यानं गुंग होताना पाहणे हा दुर्लभ योग पाहायला मिळाला. उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचलनालय यांच्या वतीने ’वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित  ग्रंथ प्रदर्शनात असंख्य बालके आपल्या हाती त्यांना आवडेल ते पुस्तक घेऊन वाचनामध्ये रमून गेलेली चित्रपहावयास मिळाले.
अ नगर वाचनालयाच्या वतीने पंधरा दिवस आयोजित या पुस्तक प्रदर्शनात असंख्य विद्यार्थी शिक्षक व रसिक वाचकांनी भेट देऊन पुस्तक वाचनाचा आनंद घेतला. यावेळी नावीन्यपूर्ण विषयावरचे पुस्तके चालताना मुले वाटेल त्या जागेवर बसून रममान झालेले चित्र खूपच अशा दायक होतं.
या प्रदर्शनात नगर शहरातील महिला मंडळ बालक मंदिर दादासाहेब रूपवते विद्यालय सिताराम सारडा विद्यालय लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालय गज चितांबर कन्या विद्या मंदिर,अरिहंत फार्मसी कॉलेज, सह  विविध शाळांनी विद्यार्थी व शिक्षक यांनी भेट देऊन मुलांना वाचनासाठी प्रेरित केले.
या प्रदर्शन यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक ,कार्यवाह विक्रम राठोड ,उपाध्यक्ष दिलीप पांढरे आनंत देसाई , तन्वीर खान,संचालक किरण अग्रवाल शिल्पा रसाळ प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी, ग्रंथपाल अमोल इथापे,सहाय्यग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल, संजय गाडेकर,संकेत फाटक,वर्षा जोशी,निखिल ढाकणे ,शेख सिकंदर,वाचनालयातील संचालक कर्मचारी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
——–