
अहिल्यानगर जिल्ह्यातील गंभीर प्रकार!
राहुरी पोलिसांकडून तपास सुरू!
बनावट नोटा छपाई प्रकरणात ३ आरोपींना अटक करण्यात आली असून, या साऱ्या रॅकेटचा मास्टरमाईंड नेमका कोण? – याचा शोध सध्या राहुरी पोलिसांकडून घेतला जात आहे.
अटक आरोपींची नावे:
पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय ३३, अर्जुननगर, करमाळा, जि. सोलापूर)
राजेंद्र कोंडिबा चौघुले (वय ४२, पाटेगाव, जि. अहिल्यानगर)
तात्या विश्वनाथ हजारे (वय ४०, पाटेगाव, जि. अहिल्यानगर)
शनिवारी प्रतीक पवार, चौगुले व हजारे यांच्यासह मोटरसायकलवरून राहुरी येथे बनावट नोटा वितरित करण्यासाठी आला असताना, राहुरी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून अटक करण्यात आली.
प्रतीक पवार याने टेंभुर्णी येथे भाड्याच्या खोलीत सुरू केला होता छोटेखानी छपाईचा कारखाना!
पोलिसांनी या ठिकाणाहून ६४ लाख ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त केले!
प्रश्नांचा पाऊस:
बनावट नोटा तयार करण्यासाठी मशीन, कागद, शाई कुठून आणले?
अजून कोणी यात सामील आहे का?
अशा नोटा अजून कुठे कुठे वितरित झाल्या आहेत?
मास्टरमाईंड कोणी?
आणि सर्वात महत्त्वाचं – या नोटा राहुरीतच कशा आल्या?
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली जात आहे.