गरजूंना शालेय साहित्याचे वाटप, आरोग्य व पर्यावरणाचा जागर:
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा उत्साहात!

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा उत्साहात!
भिंगार – अहिल्यानगर जिल्हा
सामाजिक क्षेत्रात आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर काम करणाऱ्या भिंगार येथील ‘हर दिन मॉर्निंग ग्रुप’ च्या रौप्य महोत्सवी स्नेहमेळाव्याचे भव्य आयोजन रविवारी पार पडले!
कार्यक्रमाचे ठळक Highlights:
‘हरदिन’च्या २५+ वर्षांच्या उपक्रमांचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन!
अनामप्रेम व भीमा गौतमी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
भिंगार हायस्कूल व मायादेवी अॅवठ विद्यालयातील १०वी व १२वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!
उपस्थित मान्यवर:
प्रमुख पाहुणे: सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते
सीए रवींद्र कटारिया
महेश पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर
ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ
उद्योजक लॉरेन्स स्वामी
सीडी देशमुख लॉ कॉलेजचे सचिव नारायण साठे
रामभाऊ विडवे व इतर मान्यवर उपस्थित
संजय सपकाळ यांचे विचार:
“शरीर आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी योग व वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. हरदिन ग्रुप २५ वर्षांपासून आरोग्य चळवळ जोपासतोय.”
“५०० हून अधिक सदस्य विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत.”
कार्यक्रमात सहभागी ठळक महिला सदस्य व कार्यकर्त्या:
प्रांजली सपकाळ, वेदना मेहेत्रे, उषा ठोकळ, लतांबाई सपकाळे, यशोदा झावरे, संगीता दरवडे, सुप्रिया सपकाळ, रजनी जाधव, शीतल सपकाळ, माया दरवडे, सुधा जावळे, रूपाली खुरपे, सुनीता खोत, सिद्धी खुरपे, श्रुती खोत, ज्योती परदेशी… आणि अनेकांनी आपली कार्यतत्परता दाखवली.
सूत्रसंचालन: रूपेश पसपुल, सचिन पेंढरकर
आभार प्रदर्शन: ज्ञानेश्वर महाराज अनावडे