सचिन तेंडुलकरने वाहिली विजय शिर्के यांना श्रद्धांजली 

विजय शिर्के यांचं करोनामुळे निधन

मुंबई :

क्रिकेटप्रेमींचा चाहता आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र आणि  मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळलेले माजी क्रिकेटपटू  विजय शिर्के यांचं करोना विषाणूमुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. 

विजय शिर्के हे ८०च्या दशकात मुंबईकडून सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत खेळायचे. आपल्या जवळच्या मित्राच्या निधनाने भावूक झालेल्या सचिनने ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
 

शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटला मोठा धक्का बसल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.  काही वर्षांपूर्वी विजय शिर्के हे मुंबईवरुन ठाण्यात स्थायिक झाले होते. आता काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.  या उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.