ब्रेकिंग: रेशनच्या तांदळाचा काळाबाजार उघड! – अकोलेत 70 क्विंटल धान्य जप्त
Adiwasi भागातील लोकांसाठी असलेलं स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न फसला!


Adiwasi भागातील लोकांसाठी असलेलं स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न फसला!
अकोले | 7 जुलै
दक्षिण तालुक्यातील खेतेवाडी आणि मोरवाडी गावासाठी रेशन धान्य नेणारे दोन ट्रकपैकी एक बिनपरवानगी अकोले विकास सेवा सोसायटीच्या गोदामात खाली करण्यात आला – आणि तिथून उघड झाला मोठा काळाबाजाराचा प्रकार!
सतर्क नागरिकांनी केली कारवाई!
सामाजिक कार्यकर्ते संदीप शेणकर, सचिन शेटे, नितीन नाईकवाडी यांच्या सतर्कतेमुळे ट्रक थेट गोदामात उतरताना पकडण्यात आला.
ट्रकमध्ये होता 70.40 क्विंटल तांदूळ!
ट्रकवर होता वाहतूक पास – पण गोदामपालाची सही असलेला अधिकृत परवाना गायब!
प्रश्नांचा भडिमार:
- गोदामपाल हजर नव्हता, मग सही कुणाची?
- मार्च महिन्याचं धान्य जुलैमध्ये का आणलं?
- परमीट का नव्हतं?
तहसील कार्यालय, पुरवठा निरीक्षक आणि पोलिसांची धावपळ
पुरवठा निरीक्षक संदीप निळे घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांच्या मागणीवर तात्काळ पंचनामा करून धान्य जप्त करण्यात आलं. त्यांनी दोषींवर कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
तळागाळातील जनतेसाठीचं धान्य काळ्या बाजारात विक्रीस निघालं होतं – पण जागरूक नागरिकांमुळे बचाव झाला!
या बातमीला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा – कारण भ्रष्टाचार फोडणं हे आपल्या सर्वांचं काम आहे!