पत्ते फेकले म्हणून फटके? छावा कार्यकर्त्यांवर मारहाण, रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना सवाल!

पत्ते फेकल्याच्या रागातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली

🎯
 पत्ते फेकले म्हणून फटके? छावा कार्यकर्त्यांवर मारहाण, रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना सवाल!

लातूर | प्रतिनिधी

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देताना पत्ते फेकले, आणि नंतर काय? संपली पत्रकार परिषद आणि सुरू झाली मारहाण!

पत्ते फेकल्याच्या रागातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली, असा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या मारहाणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण सहभागी असल्याचंही व्हिडिओत स्पष्ट दिसतंय.

या प्रकारावर रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी X वर म्हटलं की – “शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री रमी खेळत असतील, तर लोकांचा संताप स्वाभाविक आहे. छावा संघटनेने पत्ते फेकले, ते चुकीचेच, पण त्यानंतर जी मारहाण झाली, ती अजूनही गंभीर आणि लाजिरवाणी आहे.”

🚨 रोहित पवारांचा थेट सवाल – “लोकांनी प्रश्न विचारले, की फटके देणार? हा नवा संदेश सत्ताधाऱ्यांकडून दिला जातोय का?”
पत्ते खेळणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांवरच हल्ले होत असतील, तर लोकशाही कुठे उरते? असा सवाल नेटिझन्समधूनही विचारला जातोय.

📢 सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून #RohitPawar #ManikraoKakate #ChhavaUnion #NCPPolitics ट्रेंडिंगला आहे.


 

#MetroUpdate #PoliticalDrama #LaturIncident #YouthPower #ViralVideo #MaharashtraPolitics