अहिल्यानगरला हवंय केंद्रीय विद्यापीठ! | खासदार नीलेश लंके यांचा ठोस पुढाकार
अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विद्यापीठाची गरज ओळखून, खासदार नीलेश लंके यांनी थेट दिल्ली गाठली आहे! सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन, अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी जोरदारपणे मांडली.

अहिल्यानगर | मेट्रो पोर्टल अपडेट
अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विद्यापीठाची गरज ओळखून, खासदार नीलेश लंके यांनी थेट दिल्ली गाठली आहे! सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन, अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी जोरदारपणे मांडली.
लंके यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट उल्लेख केलाय की —
“शिक्षण हे राष्ट्राचा कणा आहे. महाराष्ट्रात आजही सर्वसामान्यांसाठी एकही ‘पूर्ण पद्धतीचं’ केंद्रीय विद्यापीठ नाही. वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे फक्त भाषिक अभ्यासापुरतंच मर्यादित आहे.”
विद्यार्थ्यांची वाढती संख्या, उच्च शिक्षणाची मागणी आणि शिक्षणासाठी होणंरं स्थलांतर लक्षात घेता, अहिल्यानगरसारख्या शैक्षणिकदृष्ट्या सक्षम जिल्ह्यात दर्जेदार केंद्रीय विद्यापीठ असणं ही काळाची गरज आहे – असं ठाम मत लंके यांनी मांडलं.
त्यांनी कर्नाटक (गुलबर्गा), केरळ (कासारगोड), गुजरात (मोसमपुरा) आणि राजस्थान (अजमेर) येथे यशस्वीरित्या स्थापन झालेल्या केंद्रीय विद्यापीठांचा संदर्भ देत, अहिल्यानगरलाही अशाच शैक्षणिक सुविधा मिळायला हव्यात हे अधोरेखित केलं.
विद्यापीठाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांकडे स्थलांतर करणं भाग पडतं – त्यात आर्थिक ताण वाढतो, आणि मानसिक दडपणही!
केंद्रीय विद्यापीठ स्थापन झाल्यास, स्थानिक पातळीवर दर्जेदार शिक्षण सहज मिळू शकेल, असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला.
“विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल, तर शिक्षणात गुंतवणूक हीच खरी गरज आहे!” – हे लंके यांच्या कृतीतून स्पष्ट दिसतंय.